वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 135. श्री विठ्ठल महात्म्य

विठ्ठल विसावा सकळिका

🙏 4. संत नामदेव · ABH-083099 · अभंग क्र. ३७८

378.
विठ्ठल विसावा सकळिका | विठ्ठल आधार तिही लोका |विठ्ठल न कळे ब्रह्मादिका |विठ्ठल देखा पंढरिये ॥१॥
विठ्ठल डोळस सावळा | विठ्ठल पाहाती अबलाबाळा |विठ्ठल ध्यावा वेळोवेळा |विठ्ठल कमलावल्लभ ॥२॥
विठ्ठल धरा रे मानसी |विठ्ठल सोडवील अहर्निशी |विठ्ठलाविण मुक्ती कैंची |कुंटणी गणिकेसी उद्धरिले ॥३॥
विठ्ठल उभा भीमातीरी |कर ठेवूनि कटावरी |विठ्ठल भक्तकाज कैवारी |विठ्ठल हरी महादोष ॥४॥
विठ्ठल अनाथा कोंवसा |विठ्ठल नुपेक्षी भरवसा |विठ्ठलेंविण शून्य दाही दिशा |विठ्ठलाविण नाही हे अनेक ॥५॥
श्रीविठ्ठल धन्य दिवस |श्रीविठ्ठल भक्तिरस |श्रीविठ्ठल परमपुरुष |विष्णुदास म्हणे नामा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग