देहांत अवसान भरलेसे
300.
देहांत अवसान भरलेसे दिसे । म्हणोनी पंढरी निवासे मोकलिले ॥१॥
कमाचे संचित प्रालब्धाचा भोग । न सुटे भागा भाग निढळीचा ॥२॥
तया अक्षरासी न पडेचि उणे । भोग तो भागणे सुखदु:ख॥ ॥३॥
चोखा म्हणे देवा तुझ्याकडे काय । आमुचे ते होय पूर्व कर्म ॥४॥
