वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(जोगी)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079440 · अभंग क्र. ३९३१

3931.
(जोगी)
जग जोगी जग जोगी । जागे जागे बोलती ॥१॥
जागता जगदेव । राखा काही भाव ॥धृपद॥
अवघा क्षेत्रपाळ । पूजा सकळ ॥२॥
पूजा पत्र काही । फल पुष्प तोय ॥३॥
बहुता दिसा फेरा । आला या नगरा ॥४॥
नका घेऊ भार । धर्म तोचि सार ॥५॥
तुका मागे दान । द्यावे जी अनन्य ॥६॥

अर्थ :
जगातील जेवढे काही योगी आहेत जे सर्व जगाला आपल्या स्वकर्तव्याविषयी जागे रहा असे सांगत आहे. जगन्नायक देवाविषयी तुम्ही जागृत रहा आणि त्याच्या ठिकाणी तुम्ही तुमचा एकनिष्ठ भक्तिभाव ठेवा. सर्व जीवमात्रांना देव मानून त्यांची पूजा करावी व क्षेत्रातील शिव विष्णूंची जेवढी काही प्रतिमा आहे त्यांची पूजा करावी. पान, फल, पुष्प किंवा पाने या कोणत्याही साधनेव्दारे त्यांची पूजा करावी. खूप दिवसानंतर या मनुष्य देहरुपी नगरामध्ये फेरा आला आहे. कोणत्याही प्रकारचा भार तुम्ही आपल्या माथ्यावर घेऊ नका धर्माने वागणे हेच खरे सार आहे व हेच खरे जीवनाचे सार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हेच दान मी तुम्हाला मागत आहे व हेच दान तुम्ही मला अनन्यभावनने दयावे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग