माझा मी विचार केला अ
163.
माझा मी विचार केला असे मना । चाळवण नारयणा पुरे तुमचे ॥१॥
तुम्हांवरी भार घातिलेसे वोझे । हेचि मी माझे जाणतसे ॥२॥
वाउगे बोलावे दिसे फलकट । नाही बळकट वर्म आंगी ॥३॥
चोखा म्हणे सुखे बैसेन धरणा । तुमच्या थोरपणा येईल लाज ॥४॥