पांघुरला घोंगडे काळे
297.
पांघुरला घोंगडे काळे । वृदांवनी गोपाळा माजी खेळे ।
काला वाटीं निजांगें गोपाळ । खेळ खेळे नानापरी ॥१॥
पाहती देव बैसोनि विमानी । ब्रह्मादिक ध्याती जया मनी ।
आराध्यदैवत सनकादिकांचे हृदयभुवनीं । शिवादि पायावणी वंदिती ॥२॥
नानापरी विटीदांडु चेंडु । हमामा हुमरी लगोर्या मांडुं ।
नव लक्ष मिळावे सवंगडु । यमुनेथडी कळंबातळी ॥३॥
गोंधने ठाई ठाई बैसविले । गोपाळ सवंगडे भोवते शोभले ।
मध्येम घननीळ ते सांवळे । नंदरायाचे गोठुलें गे माये ॥४॥
एका जनार्दनीशरण । पाहता देही विरालें देहपण ।
संपुर्ण जनी जनर्दन । पाहता पाहता गेलों भुलोन गे मायें ॥५॥
