काय विघरुनी केले पाण
767.
काय विघरुनी केले पाणी ।
घडिली अवनी कासयाची ॥१॥
महिमा जाणे त्याचा तोचि ।
नेणे विरंची जरी ज्ञाता ॥२॥
काय पिंजुनी केले गगन ।
निर्मिला हुताशन कासयाचा ॥३॥
निळा म्हणे भरोनि अंबरा ।
निर्मिला वारा कासयाचा ॥४॥
767.
काय विघरुनी केले पाणी ।
घडिली अवनी कासयाची ॥१॥
महिमा जाणे त्याचा तोचि ।
नेणे विरंची जरी ज्ञाता ॥२॥
काय पिंजुनी केले गगन ।
निर्मिला हुताशन कासयाचा ॥३॥
निळा म्हणे भरोनि अंबरा ।
निर्मिला वारा कासयाचा ॥४॥