संत एकांती बैसजे ।
1076.
संत एकांती बैसजे ।
सर्वही सिध्दात शोधिले ।
ज्ञानदृष्टी अवलोकिले ।
सारांश काढिले निवडुनी ॥१॥
ते एक श्रीहरींचे नाम ।
सकळ पातका करी भस्म ।
अधिकारी उत्तम आणि अधम ।
चारी वर्ण नरनारी ॥२॥
विठ्ठल नामे उच्चार ओंठी ।
विठ्ठल मूर्ती पाहता दृष्टी ।
लाभे ब्रम्हतेची पुष्टी ।
वाढे पोटी निज शांती ॥३॥
देखता कापती त्या काळ ।
हरिच्या ऐसे अंगी बळ ।
प्रगटे वैराग्य अढळ ।
तुटती मळ ममतेचे ॥४॥
महा दोषांची झाडणी ।
अहंभावादिकांची गाळणी ।
उभय कुळे बैसवोनि ।
जाती विमानी वैकुंठा ॥५॥
ऐसा नामाचा प्रताप ।
उरो नेदी पुण्य पाप ।
भंगूनिया त्रिविधताप ।
ठाकती सद्रूप होऊनि ॥६॥
दृष्य नुरे त्यांचिये दृष्टी ।
ब्रम्हानंदे कोंदे ।
निळा म्हणे धरिता कंठी ।
बीजमात्र हरिनाम ॥७॥
