वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

सृष्टीच्या संमता सूर

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090009 · अभंग क्र. २२४

224.
सृष्टीच्या संमता सूरतरुतरु । बोलिला विस्तारु धर्मशास्त्री ॥१॥
नेघो हे तरु प्रपंच परिवारु । प्रत्यक्ष ईश्वरु पुरे आम्हा ॥२॥
निवृत्ति निवांत हरीच सेवीत । दोअक्षरी उचित इंद्रियासी ॥३॥

अर्थ:
धर्मशास्त्रात सांगितल्या प्रमाणे ही सृष्टी त्या परमात्माने मायेला स्वतःतुन उत्पन्न करुन रचली. तो निर्गुण अकर्ता मायेच्या रुपाने सगुण सृष्टीचा आदिबीज झाला व त्यातुन ह्या संसारवृक्षाची सुरवात झाली. पण मी ह्या संसार वृक्षाचा विचार करत नाही आम्ही फक्त त्या बीजरुप हरिला हृदयी धरतो. निवृत्तिनाथ म्हणतात, मी सर्व इंद्रियासहित हरि ह्या दोन अक्षरांचा निवांत जप करत आहेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग