वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

ऐसे बोलोनिया ते उन्म

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089835 · अभंग क्र. १६२

162.
ऐसे बोलोनिया ते उन्मत ।
ठोक फोडिले सक्रोधयुक्त ।
आले सन्मुखचि धावत ।
कृष्णबळिरामेंसी झगटावया ॥१॥
त्या देखोनिया बळिराम ।
आणि हासोनी बोलती मेघ:श्याम ।
तुम्ही करु आलेती संग्राम ।
तरी निरऊनिया स्त्रिया बाळा ॥२॥
आजिवरी भोगिलिया संपत्ती ।
त्याच्या संगे सुख विश्रांती ।
त्यासी न पुसता जाणे अंती ।
महापंथी हे उचित नव्हे ॥३॥
कंसारायाचे वैभव ।
भोगिले चिरकाळवरी सर्व ।
त्याचिये काजी वेचिता जीव ।
पावाल स्वयमेव उत्तम गती ॥४॥
परी एक सांगतो विचार ।
संग्रामी न सांडावा धीर ।
जे जे वसउनिया शरीर ।
असेल विदया ते ते दावा ॥५॥
बहुत वल्गना आता ।
वस्तादाते न पुसता ।
यावरी तरी निश्रचळ चित्ता ।
करुनिया आठवा तयाते ॥६॥
निळा म्हणे बोलोनी ऐसे ।
युध्दी उठावले सरिसे ।
मातंगा देखोनिया जैसे ।
सिंह पाडे भुकाळू ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग