उमान - अभंग २०५
205.
उमान - अभंग २०५
बैसोनियां निवांत घालिसी उमान । एका हरिविण सर्व वाया न धरी गुमान ॥१॥
नको खेळ खोटा सांडीं मनाचा ताठा । उमान गुमान दोन्ही न कळे होतील जगी चेष्टा ॥२॥
उ म्हणनें उकार रे मा म्हणणे मकार रे । न म्हणणे नश्वर देह या तिहींचा आकार रे ॥३॥
एका जनार्दनी उमार रे । सांगो जाता न कळे खुण तया म्हणिजे गुमान रे ॥४॥
