वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

सांसारिके ज्ञाने तरस

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075872 · अभंग क्र. १९६

196.
सांसारिके ज्ञाने तरसी संसार ।
हा तुझ निर्धार जाय वाया ॥१॥
यालागी तू मूळ आत्मज्ञान साधी ।
तोडोनी उपाधी अंतरीची ॥२॥
स्वर्गाशी जाशील ते जरी साधिले ।
व्यर्थ तेणे गेले पूर्व तुझे ॥३॥
ब्रह्मांडी चढविला प्राणवायु जरी ।
व्यर्थ ते अवधारी जाईल रया ॥४॥
मंत्र उपासने साधिली दैवते ।
श्रम तोचि तेथे फळा आला ॥५॥
बहेणि म्हणे शोध करी आत्मत्वाचा ।
मग तुज कैचा जन्ममृत्यु ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग