वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

पोटी शूळ अंगी उटी चं

🙏 3. संत तुकाराम · ABH-077918 · अभंग क्र. २१०५

2105.
पोटी शूळ अंगी उटी चंदनाची । आवडी सुखाची कोण तया ॥१॥
तैसे मज का गा केले पंढरिराया । लौकिक हा वाया वाढविला ॥धृपद॥
ज्वरिलियापुढे वाढिली मिष्टान्ने । काय चवी तेणे घ्यावी त्याची ॥२॥
तुका म्हणे मढे शृंगारिले वरी । ते चि जाली परी मज देवा ॥३॥

अर्थ :
अंगाला चंदनाची उटी लावने खूप चांगली गोष्ट आहे परंतु ज्याचे पोट दुखते त्याच्या अंगाला जरी चंदनाची उटी लावली तरी त्याला त्या सुखाची काय आवड राहणार आह? हे पंढरीराया तसे तुम्ही माझ्या बाबतीत का केले विनाकारण माझा लौकिक तुम्ही वाढविला. ताप आलेल्या मनुष्याच्या पुढे अनेक प्रकारचे मीष्टांन्न वाढले तरी तापीने त्याची आधीच जीभ कोरडी पडल्यामुळे त्याला त्या पदार्थांची काय चव कळणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा एखाद्या मढयाला वर वर शुंगार केला तर काही उपयोग होतो का ? तशीच अवस्था माझी झाली आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग