वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ५, गुरु वर्णन अभंग ७०२ ते ७०४

गुरूज्ञान नाही ज्यास

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074580 · अभंग क्र. ७०३

703.
गुरूज्ञान नाही ज्यासी । तरुणोपाय नाही त्याशी ।
तो नावडे ऋषीकेशी । व्यर्थ जन्मासी तो आला ॥१॥
देव धर्म नेणे काही । धरी प्रपंचाची सोई ।
त्या कोठेही थार नाही । हे वेद बोलिलासे ॥२॥
कृष्णकथा जो नायके । रामनाम न म्हणे मुखे ।
तया सोसकोटी दुःखे । जन्म योनी भोगू लागेल ॥३॥
ज्ञानदेवी अभ्यास केला । सर्व संसार हा तारिला ।
रामकृष्णे भवपाश तोडिला । सर्व पितरांसहित ॥४॥

अर्थ :
ज्या पुरूषाला गुरूंचा अधिकार कळत नाही. त्याला संसार समुद्रातून तरून जाता येणार नाही. इतकेच काय पण तो देवाला देखील आवडत नाही. त्याचा जन्म निष्फळ आहे. ज्याला देवधर्म आवडत नाहीत व प्रपंचाची कास धरून चालला आहे. त्याला ऐहिक अगर पारलौकिक कुठेही सुख मिळणार नाही. हे वेदानीच सांगितले आहे. जो कृष्णकथा ऐकत नाही मुखाने राम राम म्हणत नाही त्या पुरूषाला कोट्यवधी जन्म घेऊन नरकयोनीत दुःख भोगावे लागतील. मी श्रीगुरूचे सहाय्य घेऊन अनेक जन्मामध्ये भगवन्नामस्मरणादि अभ्यास केला म्हणून हा संसारसमुद्र तरून गेलो. मी स्वतःच तरून गेलो असे नाही तर माझ्या सर्व पूर्वजांचा संसार पाश तोडून मी त्यांना मुक्त केले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग