आयुष्याच्या अंतीं ।
858.
आयुष्याच्या अंतीं । राम म्हणता वक्त्रीं । ते नर सेविती मुक्ती । संदेह नाही ॥१॥
हात पाय सिद्ध आहे । तंव तू तीर्थाजाये । तीर्थाचें मूळ पाहे । राम जप ॥२॥
नको जप माळा कांही । उगाच बैसे एके ठायी । हृदयी दृढ ध्याई । राम नाम ॥३॥
ऐसे घेई पा उपदेश । नको करु वाउगा सोस । तेणे होय नाना क्लेश । जन्म यातना ॥४॥
हेंचि तुज सोपे वर्म । येणे तुटे कर्माकर्म । एका जनार्दनी श्रम । सर्व नासे ॥५॥
