एकदां तरी दाखवा डोळा
624.
एकदां तरी दाखवा डोळा ।
तोचि वेळोवेळा आठवीन ॥१॥
सवरुप तुमचे पुरुषोत्तमा ।
अहो मनोरमा विश्वाचिया ॥२॥
मग ती तुम्हा न करी पीडा ।
संदेह येवढा निवारिल्या ॥३॥
निळा म्हणे अंतर जाणा ।
यदर्थी कृपणा नये होऊ ॥४॥
624.
एकदां तरी दाखवा डोळा ।
तोचि वेळोवेळा आठवीन ॥१॥
सवरुप तुमचे पुरुषोत्तमा ।
अहो मनोरमा विश्वाचिया ॥२॥
मग ती तुम्हा न करी पीडा ।
संदेह येवढा निवारिल्या ॥३॥
निळा म्हणे अंतर जाणा ।
यदर्थी कृपणा नये होऊ ॥४॥