त्रिभुवनाची परि. मां
2134.
त्रिभुवनाची परि. मांडिली शरीरी |गोकुळाभीतरी उभारिली ॥१॥
शेषाचिये दृष्टी मूळ भूमिका चोखटी |तेथूनि मूळ दृष्टी आरंभिली ॥२॥
मन विदानी आणि कुंडलिनी चतुर्दळांपासुनी |पवनवेगी टाकुनी पति समया स्वाधिष्ठानी ॥३॥
मणिपुरपर्यंत कळवंट शोभिवंत |तेथुनि टाकितसे नीट कमेंभूमो ॥४॥
बारा सोळा नारी श्रीपति मुरारी |हृदयमंदिरी गोपिराजु ॥५॥
कनक घाटेवरी सत्रावी सुंदरी |चाले उन्मत्त भारी चंद्रकळा ॥६॥
तेथे रोवियला दारवंटा दावी त्याच्या वाटा |जावया वैकुंठा गौळियासी ॥७॥
मृत्युलोकींच्या सेवरा आल्या ज्या चौबारा |देखिल्या त्या धरा चौधीजणी ॥८॥
|त्या चिपोळीया वाहती मिळोनिया येती |चालती मागती पश्चिमपंथी ॥९॥
अनुहतावरी वाट करुनी नीट |विशुद्ध नगरा येती धीट ॥१०॥
तेथुनी वाट असे नीट दारवंटा |तेथुनी जावे ब्रह्मरंध्र कपाटा ॥११॥
|हेंचि परब्रह्म राऊळ तेथुनी |जाऊ नये पुढारी सांडुनी राया ॥१२॥
तेथे रविशशीवरी आणि ब्रह्मरशमी स्वरूप |एकांत ओवरी आहे अमूप ॥१३॥
विष्णुदास नामा सांगे निर्वाणीच्या खुणा |अनुभवी तोचि जाणे येरा चोजवणा |॥१४॥
