काय तुझे वेंचे मज भे
219.
काय तुझे वेंचे मज भेटी देता । वचन बोलता एक दोन ॥१॥
काय तुझे रूप घेतो मी चोरोनी । त्या भेणे लपोनी राहिलासी ॥२॥
काय तुझे आम्हा करावे वैकुंठ । भिवो नको भेट आता मज ॥३॥
तुका म्हणे तुझी न लागे दसोडी । परी आहे आवडी दर्शनाची ॥४॥
