वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

कीविलवाणा झाला आता ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-080498 · अभंग क्र. ३२५२

3252.
कीविलवाणा झाला आता । दोष करिता न विचारी ॥१॥
अभिलाषी नारी धन । झकवी जन लटिकेचि ॥धृपद॥
विश्वासिया करीता घात । न धरी चित्त कांटाळा ॥२॥
तुका म्हणे नाही आला । वृथा गेला जन्मासी ॥३॥

अर्थ :
पाप करताना पापी मनुष्याने कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही परंतू दु:ख भोगताना बघा किती केविलवाणा झाला आहे. अशा या पापी मनुष्याने परस्त्री व परधनाची अभिलाषा धरली व खोटे बोलून लोकांची फसवणूक केली. विश्वासू मनुष्याचा याने घात केला घात करताना कोणत्याही प्रकारचा मनामध्ये कंटाळा धरला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पाप करताना याला कोणत्याही प्रकारचा विचार किंवा कंटाळा आला नाही त्यामुळे हा या जन्मी तर मेलाच परंतू पुन्हा जन्माला आला.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग