वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

म्हणवितो नंदाचा बाळ

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-089997 · अभंग क्र. २०३

203.
म्हणवितो नंदाचा बाळ यशोदेचा । आपण चौवाचातीत कृष्ण ॥१॥
शब्दासि नातुडे बुद्धिसि सांकडे । तो सप्रेमे आतुडे स्मरता नाम ॥२॥
उपचाराच्या कोटी न पाहे परवडी । तो प्रेमळाची घोडी धोई अंगे ॥३॥
निवृत्तिचे तप फळले अमुप । गयनिराजे दीप उजळिला ॥४॥

अर्थ:
नंद व यशोदेचा मुलगा म्हणवुन घेणारा तो श्रीकृष्णाचे वर्णन करणे चारी वाणीना ही शक्य नाही. त्या श्रीहरिचे प्रेमाने नाव घेतले तर तो साकार होतो नाहीतर बुध्दीला तो सापडत नाही शब्दात सांगता येत नाही. कोटी उपचार केले तरी त्यांना तो जाणत नाही पण भक्ताच्या प्रेमासाठी त्याचे घोडे ही धुतो. निवृत्तिनाथ म्हणतात, श्री गुरु गहिनीनाथानी ज्ञानदीप उजळल्यामुळे व मागचे तप असल्यामुळे तो फलद्रुप झाला.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग