सर्वभावे जे झाले उदा
1429.
सर्वभावे जे झाले उदास । धरुनिया आस कीर्तनी ॥१॥
सर्व काळ सर्व वाचे । सर्व साचे कीर्तन ॥२॥
सर्वा देही सर्व वेदेहीं । सर्वा वदवी कीर्तन ॥३॥
सर्व मनी सर्व ध्यानीं । सर्वा ठिकाणी कीर्तन ॥४॥
सर्व देशी सर्व गांवी । एका भावीं कीर्तन ॥५॥
