वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › २५, सौरी अभंग ९९५

होय सौरी आता उघडा घा

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074718 · अभंग क्र. ९९५

995.
होय सौरी आता उघडा घाली माथा ।
परपुरुषी रमल्या बाई त्याची पतिव्रता ॥१॥
कर्मेवीण सौरी झाले आले संतापाशी ।
ज्ञान डौर घेऊनि करी लिंग देह नाशी ॥२॥
रांडव राहू नका बाई पाहुनी करा वर ।
तेणे तुम्ही सुखी व्हाल आयव मरण वर ॥३॥
रांडावा ज्या ज्या मरती बाई त्यासी नाना योनी ।
स्वामी करुनी सुखी होई खुंटती येणी जाणी ॥४॥
निवृत्तिप्रसादे ज्ञानदेव बोले ।
स्वामी करुनी सहज निजानंदी डोले ॥५॥

अर्थ :
सौरी म्हणजे स्वैर वागणारी स्त्री म्हणते. तू माझ्या सारखी डोक्यावरचा पदर टांकून माथा उघडा कर. भगवंताची माथा उघडा करुन माझ्या प्रमाणे या परमश्रेष्ट पुरुषाशी ज्या रमल्या त्याच श्रेष्ट पतिव्रता होत. मी सकाम कर्माचा त्याग करून सौरी बनले. आणि संतांच्या जवळ जाऊन, हातांत ज्ञान डौर घेऊन, लिंग देहाचा नाश केला. तुम्ही सुद्धा अशा स्वरुपाच्या नवऱ्याशिवाय राहू नका, असाच पति नीट पाहून तुम्ही करा, त्यामुळे तुम्ही सुखी व्हाल. कारण सौभाग्य असतानाच मरण येणे चांगले. ज्या बायका विधवा होऊन मरतील म्हणजे परमात्मप्राप्ती वांचून मरतील त्यांना नानायोनीतून पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. म्हणून तुम्ही त्या परमात्म्याला वरुन सुखी व्हा त्यामुळे तुमची जन्ममरणाची येरझार नाहीसी होऊन जाईल. श्रीनिवृत्तिनाथांच्या कृपेने मी असे सांगत आहे की या श्रीहरिस तुम्ही स्वामी करा व मग सहजानंदांत नित्य डुलत राहा. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग