वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 11. नाटाचे अभंग › नाटाचे अभंग

आइका पांडुरंगा एक मा

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072907 · अभंग क्र. ४०६३

4063.
आइका पांडुरंगा एक मात । काही बोलणे आहे एकांत । आम्हा जरी तारील संचित । तरीच उचित काय तुझे ॥१॥
उसने फेडिता धर्म तो कोण । काय तया मानवेल जन । काय गा मिरवूनी भूषण । वाया थोर पण जनामध्ये ॥धृपद॥
अन्न जरी न मिळे तयासी देणे । अंगातुक पात्र उचित दान । उपकार तरी धन्वंतरीपणे । जरी देणे घेणे नाही आशा ॥२॥
शूर तो तयासी बोलीजे जाणा । पाठीसी घालूनी राखे दिना । पार पुण्या त्या नाही भूषणा । एक नारायणा वचन हे ॥३॥
आता पुढे बोलणे ते काही । मज तारिसील तरीच सही । वचन आपुले सिद्धी नेई । तुका म्हणे तई मज कळसी ॥४॥

अर्थ :
हे पाडूरंगा तुम्हाला एक गोष्ट मला एकातात सांगायची आहे ती तुम्ही ऐका. आम्हाला जर आमचे संचित तारीत असेल तर त्यामध्ये तुझे महत्व तरी काय आहे ? उसने घेतले आणि ते पुन्हा फेडले तर त्यामध्ये धर्म आला तरी कसा आणि लोकांना हे मान्य होईल काय ? व्यर्थ लोकांमध्ये आपले भूषण आपले मोठेपण का मिरवावे ? ज्याला अन्नच मिळत नाही आणि एखादा आगंतुक याचक आपल्या दारात जर आला तर त्याला दान देणे हे उचित आहे. रोग्याला बरे करण्यासाठी वैदयाने कोणत्याही प्रकारची देण्याघेण्याची आशा न करता सत्पात्री औषधाचे दान करावे तरच ते परोपकार घडेल. जो दीनजनांना आपल्या पाठीशी घालून त्यांचे रक्षण करतो त्यालाच शूर म्हणावे हे तुम्ही जाणून घ्यावे. त्याच्या पुण्याला आणि त्याच्या भूषणाला म्हणजे मोठेपणाला पारावारच नाही म्हणजे अंत:पारच नाही हे नारायणा हे माझे शब्द तुम्ही ऐकावे. तुकाराम महाराज म्हणतात, आता यापुढे काय बोलावे जेव्हा तू मला तारशील तेव्हाच खरे. देवा ज्यावेळी तू आपले पतितपावन हे ब्रीद स

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग