पाखांडयांनी पाठी पुर
438.
पाखांडयांनी पाठी पुरविला दुमाला । तेथे मी विठ्ठला काय बोलो ॥१॥
कांद्याचा खाणार चोजवी कस्तुरी । आपुले भिकारीअर्थ : नेणे ॥धृपद॥
न कळे ते मज पुसती छळूनी । लागता चरणी न सोडिती ॥२॥
तुझ्या पायाविण दुजे नेणे काही । तूचि सर्वाठायी एक मज ॥३॥
तुका म्हणे खीळ पडो त्यांच्या तोंडा । किती बोलो भांडा वादकासी ॥४॥
अर्थ :
देवा पाखंडयांनी माझी पूर्णपणे पाठ पुरवली म्हणजे पाटला केलेला आहे आता यांच्याविषयी मी काय बोलू ? नुसतेच कांदे खाणाऱ्याला कस्तुरीचा वास काय समजणार आहे स्वतः भिकारी असताना कस्तुरी प्राप्तीची इच्छा असून काय उपयोग आहे ? जी गोष्ट मला कळत नाही तीच गोष्ठ मला छळुन विचारतात आणि माझे पाय घट्ट धरून सोडत नाही. देवा तुमच्या चरणा वाचून मी दुसरे काहीच जाणत नाही सर्व ठिकाणी तुम्हीच माझ्यासाठी सर्वकाही आहात. तुकाराम महाराज म्हणतात या नास्तिक लोकांची वाचेलाखिळ पडो अश्या भांडखोर लोकांशी मी किती बोलू ?
