(हिंदुस्तानी भाषेतील
3493.
(हिंदुस्तानी भाषेतील अभंग)
कब मरू पाऊ चरन तुम्हारे । ठाकुर मेरे जीवन प्यारे ॥१॥
जग डरे ज्याकु सो मोहि मीठा । मीठा दर आनंदसाहि पैठा ॥धृपद॥
भला पाऊ जनम इन्हे बेर । बस मायाके असंग फेर ॥२॥
कहे तुका धन मानहि दारा । वोहिलिये गुंडलि पसारा ॥३॥
अर्थ :
कधी मी हा देह त्याग करीन आणि कधी मला ठाकूरजीचे चरण प्राप्त होतील असे मला वाटते आहे कारण ठाकूर माझ्या जीवनापेक्षाही मला प्रिय आहेत. सारे जग ज्या मरणाला भिते ते मरण मला अतिशय गोड वाटते आणि पुन्हा पवित्र असा हरीभक्तांच्या घरी जन्म घेऊन तेथे आनंदाने राहाणे मला गोड वाटते. एकदा की हरीभक्ताच्या घरी मी पुन्हा जन्माला आलो की मी सर्व मायेचे फेरे चुकवून असंग रुपाने राहीन. तुकाराम महाराज म्हणतात, मी धन दार मान सन्मान सर्व पसारा गुंडाळला आहे.
