येई तू मधुकरे मदनसुं
626.
येई तू मधुकरे मदनसुंदरे | मज गे न धरे प्रेम पोटी ॥१॥
तू माझी जननी मधुसूदन गाय | कामधेनु होय कांसवीची ॥२॥
आनंद निजधने जुनाट मधुसूदने | शुकस्तनपान पाजी पान्हा ॥३॥
केशव कांसवी पद रानगाय | आत्माराम होय निःसंदेह ॥४॥
विठ्ठलमुकुंदे स्वरूपे गोमटी | आकांतली सृष्टी मधुसूदने ॥५॥
शंखचक्रांकित आयुधे मंडित | मुकुट शोभत तुझा शिरी ॥६॥
भक्तवरदायिनी मधुसूदन गंगा | व्हावे तू-वो वेगा कामधेनु ॥७॥
नामा म्हणे माये मधुसूदन गाय | ते संजीवनी होय आम्हालागी ॥८॥
