दिसंदिस कैसा जालासी
517.
दिसंदिस कैसा जालासी शहाणा | गोवळांसी खेळसी पंढरीच्या राण्या ॥१॥
विश्वामाजी तुझे बोभाट मोठे | जन्म मारणाचे संकल्प तुट ॥२॥
अकळ करणी नकळे लिहिता धरणी | सिंधुशिरोमणि करुनि नाम तुझे ॥३॥
नामा म्हणे कीर्ति काय वानू देवा | भक्तांचा कुडावा ब्रीद तुझे ॥४॥
