वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 219. स्वप्न

देह मंदिराभीतरी | शे

🙏 4. संत नामदेव · ABH-081958 · अभंग क्र. २१४५

2145.
देह मंदिराभीतरी | शेजे सूदला श्रीहरी |निद्रा उन्मनीचे भरी | ते म्या स्वप्नी देखिले ॥१॥
स्वप्ना भुलले बाई | मागील नाठवेचि कांही |हा जोव परवस्तुच्या ठायी | तनुमने आटला ॥२॥
स्वप्न सांगू कोणासी | विवेक करिती तयासी |हे कोडे अज्ञानासी | संतावांचुनी नुगवे ॥३॥
ध्यानी पहुडला सांवळा | जवळी नारी बारा सोळा |विजणे वारिती सकळा | सोह शब्दे जागरणी ॥४॥
धि धि तुरे वाजती | अनुहत ध्वनि गर्जती |तेथे निद्रा ना सुषुप्ती | चंद्र सूये मावळले ॥५॥
मन पवना नाही भेद | तया ठायी हा गोविद |तेथे खुंटला अनुवाद | वेदश्रुति आटल्या ॥६॥
म्हणे विष्णुदास तामा | जन्ममरण नाही आम्हा |कृपा केली मेघश्यामा | संतसंगे तारिलो ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग