पंढरीचा देव तत्सच्चि
466.
पंढरीचा देव तत्सच्चित अद्वय | तूंचि मायबाप पांडुरंगा ॥१॥
सगुण निर्गुण दाविसी प्रकार | दही अवतार निमित्तासी ॥२॥
ऐसा माझा स्वामी समर्थ गोविंद | निरंतर छंद हरिनामी ॥३॥
नामा म्हणे कांही न धरिसी लाज | भाविकांसी गुज कानी सांगे ॥४॥
