वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ७, बाळक्रीडा, अभंग १६७ ते १८८

माथे टेकित बाह्या पस

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074884 · अभंग क्र. १७३

173.
माथे टेकित बाह्या पसरित । डांगाचे आधार घेती ॥धृ॥
एक म्हणती आम्ही उचलिला पर्वत । बहुत मिळोनी काये नव्हती रे ॥
बाहे कडाडित मनगटे लचकत । म्हणोनी उठिले अवघे रे ॥
तयामाजी असता न दिसे । समर्थ थोर तुझी माव रे ॥
काळु आतुडे परी वेळु नातुडे । म्हणोनी रक्षिले सरळा रे ॥
बापरखुमादेविवरू विठ्ठल साचा । म्हणोनी रक्षिले आम्हा रे ॥

अर्थ :
गोवर्धन पर्वत आम्ही डोक्याचा व हाताचा आधार देत उचलला असे त्या भगवंताचे सामर्य्थ लक्षात न घेता ते बोलू लागले. आम्ही सर्वांनी तो उचलला असे म्हटले तर काय झाले या गडबडीत काहीचे दंड मोडले मनगट लचकले हे पाहून काहीजण उठलेच नाहीत. तरी तो पर्वत देवाने एका करंगळीवर उचलला हे कोणाच्या लक्षातच आले नाही. काळच आला होता पण वेळ आली नव्हती म्हणून सर्वांचे रक्षण झाले. माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल यांनी आमचे रक्षण केले असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग