पाहा क्षीरसागरीचा हर
35.
पाहा क्षीरसागरीचा हरी । तोचि आला भीमातीरी ॥१॥
भक्ता पुंडलिका कारणे । केले सुखे येणे पेणे ॥२॥
पेठ वसविली पंढरी । भूवैकुंठ मही वरी ॥३॥
निरे भिवरेचे तटी । कर मिरवले कटी ॥४॥
ठेविले विटेवरी समचरण । चोखा घाली लोटांगण ॥५॥