वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ६, संतपर अभंग ७०५ ते ७०९

अमृताची कुंडी निद्रि

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074295 · अभंग क्र. ७०६

706.
अमृताची कुंडी निद्रिस्त मरण ।
झणे त्या दूषण बोलती रया ॥१॥
वासना संग धीट प्रकृति कनिष्ठ ।
भोगूनी वैकुंठ जन्म घेती ॥२॥
तैसे नव्हे सारासार तत्त्व निवृत्ति ।
बुडउनी प्रवृत्ति आपण नांदे ॥३॥
ज्ञानदेवे बोले अमृत सरिता ।
सर्वा घटी पुरता हरि नांदे ॥४॥

अर्थ :
ज्ञानप्राप्त करून घेण्याची सोय ही नरदेह अमृताची कुंडी मनुष्याला लाभली असून तो त्याकडे दुर्लक्ष करून मृत्यू पावतो. या करिता तू दूषण देशील. परंतु कनिष्ठ स्वभावाचे विषयी पुरूष स्वर्गादि भोगांची वासना धरून त्याप्रमाणे कर्मे करून वैकुंठातील भोग भोगतात. व पुण्य संपल्यानंतर पुन्हा जन्माला येतात. मुमुक्षुची तशी स्थिती नाही. ते विषयप्रवृत्तीस आपल्या ताब्यात ठेऊन निवृत्ति मार्गाने कालक्रमण करितात. श्रीहरीच्या रूपाने ज्ञानरूपी अमृत गंगा सर्वत्र सर्वांच्या हृदयांमध्ये परिपूर्ण भरलेली आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग