कुमुदिनी काय जाणे तो
235.
कुमुदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥
तैसे तुज ठावे नाही तुझे नाम । आम्हीच ते प्रेमसुख जाणो ॥२॥
माते तृण बाळा दुग्धाची ते गोडी । ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥३॥
तुका म्हणे मुक्ताफळ शिंपी पोटी । नाही त्याची भेटी भोग तिये ॥४॥
