दुजा छंद नोहे वाचे ।
1074.
दुजा छंद नोहे वाचे । वदे साचे हरिनाम ॥१॥
कोटी कुळें होती पावन । नामस्मरण करितांची ॥२॥
यम न पाहे तयाकडे । वांडें कोंडे नमस्कारी ॥३॥
विधी शची उमारमण । वंदिती चरण आवडी ॥४॥
म्हणे जनार्दनाचा एका । उपाय नेटका कलियुगी ॥५॥