वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

डोळा माझा बाप त्रिभु

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075084 · अभंग क्र. ४२३

423.
डोळा माझा बाप त्रिभुवना परता ।
जो देखे मुक्तता तोचि लाहे ॥१॥
जीव जंतु कृमी मुंगी नेत्रामध्ये ।
वास्तव्य गोविंदे केले पाहा ॥२॥
ज्ञानदेवाचे बोल उघड निर्मळ ।
जान्हवीचे जळ स्थिर वाहे ॥३॥

अर्थ :
त्रिभुवनाहूनही पलिकडे असणारा डोळा म्हणजे परमात्मा तो माझा बाप आहे. त्याला जो पाहतो त्याला पाहण्या बरोबर मोक्ष प्राप्त होतो. जन्तु कृमी वगैरे सर्व जीवांच्या डोळ्यामध्ये गोविंदानेच वास्तव्य केले आहे. माझे बोलणे उघड असून गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ व स्थिर वाहात आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग