वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

जे जे पाहु जाय सुमने

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074407 · अभंग क्र. ४८७

487.
जे जे पाहु जाय सुमने करूनी ।
अदृश्य होऊनी तेचि लपे ॥१॥
दुजेचि न दिसे काय आता करू ।
कवणा विचारू सुखगोष्टी ॥२॥
आपणाआपण विचारिजे आथी ।
जाहली विश्रांति मीपणाशी ॥३॥
बाहेर भीतरी एकमेंव दिसे ।
अन्यथा हे नसे गुरूसाक्षी ॥४॥
ज्ञानेश्वर हे गिळुनीया नाम ।
ब्रह्मचि स्वयमेव सांठविले ॥५॥

अर्थ :
आत्मज्ञान झाल्यानंतर चांगल्या मनाने ज्या ज्या दृश्य वस्तुकडे पाहू गेले असता ती सर्व दृश्य वस्तु ब्रह्मरूप आहे असा निश्चय होऊन जातो. आता जगतात परमात्म्यावाचून दुसरा पदार्थच मला दिसेनासा झाला. आता मी सुखाच्या गोष्टी कुणाला विचारू. त्याचा विचार आत्म्यासीच करावा असे म्हंटले तर मीपणाची हरिस्वरूपाच्या ठिकाणी विश्रांति झाली. म्हणजे मी म्हणून विचार करणारा त्या हरिहून वेगळा नाहीच सदगरूच्या कृपेने सर्व पदार्थाच्या ठिकाणचे नामरूप नाहीसे होऊन आत बाहेर दिसते. ४ आंत, बाहेर, जिकडे, तिकडे पाहावे तिकडे मला साक्षी ब्रह्मरूपच ठसवलेले दिसते. नामरूप संपवून मला जिकडे तिकडे ब्रह्मच भरलेले दिसते असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग