वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 149. श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा

ऐसे देखिले वैष्णवी |

🙏 4. संत नामदेव · ABH-081689 · अभंग क्र. १००६

1006.
ऐसे देखिले वैष्णवी | वैकुंठ नगरी चिरंजीवी | आणि ज्ञानदेव गोसावी | विष्णुमूर्ती चतुर्भुज॥१॥
तालालोरी वाजविती पावा | समाधान होतसे जीवा | नामा विनवितो केशवा |तुझ्या दरूशने निवालो ॥२॥
तंव रूक्मिणीने विनविले | यासि भोजन सारा का वहिले | तंव अक्रूरे पाचारिले |समस्तांसी देखा ॥३॥
उद्धव घालित आसने | ताटे विस्तारिली बोने | राही रुक्मिणी विचक्षणे | पंचामृते वाढिती ॥४॥
समस्त भक्त दाटले | पांतीकर एकवटले |नानापरी भात विस्तारिले |परिमळित मघमघा ॥५॥
वरी मिरवे मुगांचे वरण | कथिका वाढिली संपूर्ण | नाना कोरिके विस्तीर्ण |रुक्मिणी वाढितसे ॥६॥
कामधेनूचे घॄत | पयोदधिक्षीर वाढित |नानापत्र शाखा शोभत | वैष्णवांचा ताटी ॥७॥
ऐसे समस्तांसी संपूर्ण | ताटे जाली विस्तीर्ण | तंव देव बोलती आपण |ज्ञानदेवासी ॥८॥
निव्रुत्ती सोपान बोलवा | मुक्ताईस वेगी आणवा | पांथिकरासी रिघावा |ताटी बैसवा समस्तांसी ॥९॥
विष्णुमूर्ती चतुर्भुज |पूजी ब्राह्मण द्विभुज| तुळसी मंजिरी केसिराज | त्यांचे मस्तकी वाहतसे ॥१०॥
चरणतीर्थ घेतले | तेणे समस्त मंदिर शिंपिले | आपण मुखी घातले म्हणे |क्रुतक्रुत्य झालो मी ॥११॥
नामा तिष्ठत उभा व्दारी | त्यांसीही रुक्मिणी ताट करी |ऐसी भोजने परोपरी| जाली वैष्णवांची ॥१२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग