काय पुण्य केले इही ज
422.
काय पुण्य केले इही जीवा जनी |पंढरी नयनी देखियेली ॥१॥
अनंता जन्माचे हेंचि प्रायश्चित्त |वाचे जपे नित्य रामनाम ॥२॥
कोटी कुळे केली क्षणेंची पावन |केल्या एक स्नान चंद्रभागे ॥३॥
शोक मोह ताप विध्वंसिला हेळा |अवलोकित डोळा पांडुरंग ॥४॥
महापापराशी तींही केल्या होळी |वाजविल्या टाळी विठ्ठलनाम ॥५॥
नामा म्हणे धन्य धन्य ते संसारी |चालविती वारी पंढरीची ॥६॥
