वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

पुरूष व्याली कन्या झ

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075791 · अभंग क्र. ५४३

543.
पुरूष व्याली कन्या झाली नवल सांगू काये ।
कन्ये बापू गरव्हार केला तो घेतो आपुली माये ॥१॥
उगवा माझे कोडे सौरी नाचे पुढे ।
पहा वेदशास्त्र याचे गुज आहे थोडे ॥२॥
नर नव्हे नारी नव्हे काहीच ते फेरी ।
असे नव्हे तसे बाई डौर आला करी ॥३॥
बहेणि घाली साद अवघो तोडुनि वेवाद ।
सौरीयाच्या वेषे नाचे सारूनि भेदाभेद ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग