नाकी तोंडी वाहे रुधि
164.
नाकी तोंडी वाहे रुधिर ।
हातापायांचा झाला चूर ।
मस्तक मेंदु उसळे बाहेर ।
मुष्टिक चाणुर निर्दाळिले ॥१॥
तया देऊनि उतम गती ।
आनंदे बळरामश्रीकृष्ण् नाचती ।
तांडव विसरे उमापति ।
कौशल्य तयांचे देखोनी ॥२॥
मोहित होऊनिया नारी नर ।
अवलोकिती बळिराम आणि श्रीधर ।
परम सुंदरा सुंदर ।
नागरा नागर भुलवणे ॥३॥
अवलोकिती कृष्णाकृती ।
लवोंचिं विसरली नेत्रपाती ।
बळिराम देवाचीही मूर्ती ।
राजस सुकुमार त्याचिपरी ॥४॥
अंगी यशाचे गौरव ।
रुप लावण्याची ठेव ।
पहाता नयना न पुरे हाव ।
मना स्वयमेव तेचि होणे ॥५॥
यापरी तटस्थ् सकळा ।
लागले नरनारी बाळा ।
तेणे बहमानंद सुकाळा ।
झाली अधिकारी भोगिती ॥६॥
निळा म्हणे यावरी रावो ।
पावेल मुक्तीचा गौरवो ।
सोलीव सुखाचा स्वानुभवो ।
समर्पील कृष्णा तयासी ॥७॥
