माडियेला खेळ हमामा ह
222.
माडियेला खेळ हमामा हुंबरी । मारुनी हिरण्यकश्यपु प्रल्हाद खेळिया करी ॥१॥
हुतुतुतु हुमरी हुतुतुतु हुमरी ॥धृ.॥
जाउनी लंकेवरी खेळ मांडियेला । रावण कुंभकर्ण वधोनि शरणगत रक्षिला ॥२॥
माडियेला खेळ खेळे अर्जुनाचे रथी । मारुन कौरव खेळे नानापरींची गती ॥३॥
धरुनी गोपेवेष मरियेला कंसमामा । नानापरी खेळ खेळे गोपाळांसी हमामा ॥४॥
येउनी पंढरेपुरा पुंडलिकासाठी । एका जनार्दनी कर ठेवुनीं उभा राहिला काटीं ॥५॥
