वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

सुख तेथे दुःख दुःख त

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074401 · अभंग क्र. ५०१

501.
सुख तेथे दुःख दुःख तेथे सुख ।
एकी ते अनेक अनेकी एक ॥१॥
देव तेथे भक्त भक्तापाशी देव ।
जाणा एकमेव भेद नाही ॥२॥
तरूतळी छाया छाया तेथे तरू ।
शिष्याठायी गुरू गुरू शिष्य ॥३॥
कण तेचि भूमि भूमिरूपी कण ।
भासा ठायी गुण गुणी भास ॥४॥
गुरूकृपे खूण वस्तु साक्षात्कार ।
भेदला ज्ञानेश्वर निवृत्तीचा ॥५॥

अर्थ :
एक परमात्माच विवर्त रूपाने जगत झाल्यामुळे एकात अनेक म्हणणे योग्य होय त्याप्रमाणे अनेक रूपाने भासणारे जगत् परमात्मरूप असल्यामुळे अनेकांत एक हे ही म्हणणे योग्य होईल जेथे सुख आहे तेथे दुःख आहेच. तसेच दुःख आहे तेथे सुख ही आहे. अविज्ञेने द्वैत मानल्यामुळे देव वेगळा मानला तर त्याचे उपासक भक्त तेथे असणारच. त्यांच्यात भेद मुळीच नसतो. झाडामुळे सावली पडत असल्यामुळे झाडा पाशी सावली व सावली पाशी झाड असणारच. शिष्यामुळे गुरुला गुरुपणा येत असल्यामुळे जिथे गुरु तेथे शिष्य असणारच. कण म्हणजे लक्षणेने पृथ्वीचे परमाणु, कणाचीच भूमी बनते. त्रिगुणात्मक माये मुळेच जगउध्दार होत असल्याने भासाचे ठिकाणी गुण व तसेच उलटे असते. अशारितीने संपुर्ण जगत व्यापून असणारी वस्तु मी आहे असे वर्म मला गुरुंच्या कृपेने अनुभवता आले. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग