(वारकरी परत आल्या नं
3594.
(वारकरी परत आल्या नंतरचे अभंग)
आता करावा का सोंस वायाविण । लटिकाचि सीण मनासी हा ॥१॥
असेल ते कळो येईल लवकरी । आता वारकरी आल्यापाठी ॥धृपद॥
बहु विलंबाचे संन्निध पातले । धीराचे राहिले फळ पोटी ॥२॥
चालिले ते ठाव पावेल सेवटी । पुरलिया तुटी पाउलांची ॥३॥
तुका म्हणे आसे लागलासे जीव । म्हणऊनि कीव भाकीतसे ॥४॥
अर्थ :
आता व्यर्थ सोस म्हणजे हव्यास का करावा जर खोटा हव्यास करावा तर तो मनाला व्यर्थ त्रासच ठरतो. आता जो काही प्रकार घडला असेल तो लवकरच कळेल एकदा की वारकरी आले की सर्व काही समजेल. वारकऱ्यांना पंढरीहून निघल्यापासून खूप दिवस झाले आहेत त्यांना येण्यासाठी खूप विलंब लागला आहे परंतू आता ते जवळच आले असतील मी ते येण्याविषयी खूपच आधीर झालो आहे पण अंत:करणात जर धीर असेल तर आपल्याला त्याचे फळ मिळतेच. जे चालतच नाहीत ते मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतच नाही पण माझे वारकरी पुन्हा मागे फिरले आहेत त्याअर्थी ते मुक्काच्या ठिकाणी म्हणजे देहूत परत येतीलच. तुकाराम महाराज म्हणतात, मी पाठवलेल्या पत्राच्या उत्तरासाठी माझा जीव आशेला लागला आहे त्यामुळे तर मी एवढी करुणा भाकत आहे.
