तांतडीने जाती । कंसा
16.
तांतडीने जाती । कंसा सेवक सांगती ॥१॥
उपजला वैरी । त्यासी तू रे त्वरे मारी ॥२॥
त्वरे धांव घाली । पाहे कन्या उपजली ॥३॥
ज्याचा धाक तुज । नव्हे कन्या द्यावी मज ॥४॥
मारायासी खड्ग घाली । हातीची निष्टूनिया गेली ॥५॥
तुजलागी वधी । उपजला मज आधी ॥६॥
सांगे ब्रम्हज्ञान । देवकीचे समाधान ॥७॥
नामा म्हणे तयेवेळी । त्यांची बंधने काढिली ॥८॥
