वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › २. सार्थ अभंग ५०१ ते १०००

आशाबद्ध तो जगाचा दास

🙏 3. संत तुकाराम · ABH-078345 · अभंग क्र. १०००

1000.
आशाबद्ध तो जगाचा दास । पूज्य तो उदास सर्वजना ॥१॥
आहे ते अधीन आपुले हाती । आणिका ठेविती काय बोला ॥धृपद॥
जाणतिया पाठी लागला उपाध । नेणता तो सिद्ध भोजनासी ॥२॥
तुका म्हणे भय बांधले गाठी । चोर लागे पाठी दुम तया ॥३॥

अर्थ :
जो आशेने बांधलेला आहे तो जगाचाचा दास आहे व जो उदास असतो तो सर्व लोकांना पूज्य असतो. आहो या गोष्टी आपल्या हातील आहेत दुसऱ्यांनादोष देण्यात कायअर्थ : ? ज्याच्या मध्ये ज्ञानी पणाचा अहंकार असतो त्याच्या मागे उपाधी लागतात आणि जो नेणता असतो त्याला केंव्हाही जेवायला बस म्हंटले तो केंव्हाही भोजनास तयार असतो. तुकाराम महाराज म्हणतात जो आशाने बद्ध व अहंकाराने मोठा असतो त्याच्या मागे काम क्रोध आदी चोर लागलेले असतात म्हणून त्याच्या पदरी मोठे भय असते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग