आसनी शयनी जपता चक्रप
819.
आसनी शयनी जपता चक्रपाणि । लाविली निशाणी वैकुंठींची ॥१॥
नाही रे बंधन आम्हा हरिभक्ता । गीती गुण गाता राघोबाचि ॥२॥
भवसिंधूची जिवा जाली पायवाट । जे गर्जती उद्धट नामघोष ॥३॥
प्रेमे वोथरत हर्षे पिटू टाळी । नाम ह्रदयकमळी विठोबाचे ॥४॥
नाही काया क्लेश न करी सायास । दृढ धरी विश्वास हरीनामी ॥५॥
नामा म्हणे साधन न लगे अनेक । दिली मज भाक पांडुरंगे ॥६॥
