वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

तुळसीमाळा घालुनी कंठ

🙏 3. संत तुकाराम · ABH-079338 · अभंग क्र. ४०६०

4060.
तुळसीमाळा घालुनी कंठी । उभा विटेवरी जगजेठी । अवलोकोनि पुंडलीका दृष्टी । असे भीमातटी पंढरीये ॥१॥
भुक्तीमुक्ती जयाच्या कामारी । रिद्धीसिद्धी वोळंगती द्वारी । सुदर्शन घरटी करी । काळ कापे दुरी धाके तया ॥२॥
जगज्जननी असे वाम भागी । भीमकी शोभली अर्धांगी । जैसी विद्युल्लता झमके मेघी । दरुषणे भंगी महा दोष ॥३॥
सुखसागर परमानंदु । गोपीगोपाळा गोधना छंदु । पक्षीश्वापदा जयाचा वेधु । वाहे गोविंदु पावा छंदे ॥४॥
मुखमंडित चतुर्भुजा । मनमोहना गरुडध्वजा । तुका म्हणे स्वामी माझा । पावे भक्तकाजा लवलाही ॥५॥

अर्थ :
तुळशीची माळ कंठात म्हणजे गळयात घालून जगजेठी विठोबा पुंडलिकाकडे आपली दृष्टी लावून त्याला पाहातो जगजेठी भीमा नदीच्या तटी पंढरी क्षेत्रात विटेवर उभा आहे भुक्ती म्हणजे भोग आणि मुक्ती म्हणजे चारही मुक्ती ज्याच्याकडे काम करणा-या दासी आहेत आणि रिध्दी सिध्दी ज्याच्या व्दारात लोटांगण घेत काम करण्यास सज्ज आहेत, आणि ज्याच्या नगराच्या भोवती सुदर्शन पहारा देत फिरत आहे त्याच्या धाकाने कळीकाळ देखील थरथर कापत असून दूर पळून जात आहे. अश्या देवाच्या डाव्या बाजूला जग्जननी रखुमाई अर्धांगिनी म्हणून शोभून दिसत आहे. वीज चमकल्यावर जशी विद्युल्लता म्हणजे प्रकाश पडतो झळकतो त्याप्रमाणे रुक्मीणी देवी दिसत आहे आणि तिच्या दर्शनाने महादोषाचा देखील भंग म्हणजे नाश होतो. असा हा देव सुखाचा समुद्र असून परम आनंद देणारा आहे त्याने गोप गोपीका व गोधनांना आपल्या वेणूचा छंद लावलेला आहे. या हरीने गोविंदाने आपल्या वेणूच्या छंदात पक्षी श्वापद यांना देखील वेध लावला आहे. तुक

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग